Fri, Mar 22, 2019 07:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांचा तडकाफडकी राजीनामा

कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांचा तडकाफडकी राजीनामा

Published On: Jun 01 2018 10:59PM | Last Updated: Jun 01 2018 10:59PMदापोली ः प्रतिनिधी 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा शुक्रवारी राज्यपालांकडे ई-मेलसह पत्राद्वारे पाठविला आहे. हा राजीनामा वैयक्‍तिक कारणामुळे दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये सेवानिवृत्त करण्यासाठी तीन महिन्यांची नोटीसही राज्यपालांकडे पाठविण्यात आली आहे. 

दि. 6 नोव्हेबर 2015 रोजी दापोली कोकण कृषी विद्यापीठामध्ये भट्टाचार्य यांनी कुलगुरूपदाची धुरा हाती घेतली त्याला अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. कुलगुरूपदाच्या कालखंडामध्ये भट्टाचार्य यांनी कृषी महोत्सवासारखे  मोठे महोत्सव विद्यापीठामध्ये राबविले. भट्टाचार्य यांचे विद्यापीठातील काम समाधानकारक असल्याची कौतुकाची थाप वरिष्ठांकडून त्यांच्या पाठीवर पडली होती. मात्र, भट्टाचार्य यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने विद्यापीठामध्ये चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दि. 31 ऑगस्टपर्यंत कुलगुरूंनी राजीनामा मागे न घेतल्यास त्यांचा ऑगस्टला कार्यकाळ संपणार 
आहे. 

दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या आजवरच्या इतिहासामध्ये कुलगुरूंनी राजीनामा देण्याची ही पहिली वेळ आहे. त्यामुळे राज्यपालांच्या निर्णयानंतरच कुलगुरू भट्टाचार्य यांच्या राजीनाम्याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.