Sun, Jul 05, 2020 22:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचे निधन

ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचे निधन

Last Updated: May 30 2020 10:22AM

ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणेठाणे : पुढारी वृत्तसेवा 

ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचे दीर्घ आजारांमुळे वयाच्या ६० व्या वर्षी ठाण्यात दुःखद निधन झाले. मृदू, लाघवी स्वभावाच्या ललिता बाईंनी सिने पत्रकारितेला गॉसिप पासून दूर ठेवून वास्तव आणि सत्याचा पुरस्कार बातम्या केल्या. त्यांचे अनेक अभिनेत्रींबरोबर मैत्री आणि स्नेहाचे संबंध होते. नूतन, स्मिता पाटील, माधुरी दिक्षित, रेणुका शहाणे, रेखा, दीप्ती नवल, मृणाल कुलकर्णी, प्रिया तेंडुलकर, प्रतीक्षा लोणकर यांच्याशी घरोबाचे संबंध होते. 

लॉकडाऊन एकदम उठवण्याची चूक करणार नाही : मुख्यमंत्री 

त्यांनी स्मिता, स्मित, मी:स्मिता पाटील, नूतन, "तें'चीप्रिया प्रिया तेंडुलकर ही पुस्तके लिहली असून ती रसिकांच्या पसंतीस पडली आहेत. तर या पुस्तकांच्या अनेक आवृत्याही निघाल्या आहेत. त्यांनी उजळल्या दाही दिशा, झाले मोकळे आकाश या दोन कादंबऱ्या लिहिल्या. सध्या त्या दीप्ती नवल यांचे चरित्र लिहीत होत्या. त्यांच्या मागे विधीज्ञ विनीत रणदिवे आणि मुलगी सोनल आणि तीन बहिणी असा परिवार आहे.