Sat, Feb 23, 2019 10:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिलीपकुमार यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल 

दिलीपकुमार यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल 

Published On: Sep 05 2018 4:57PM | Last Updated: Sep 06 2018 1:41AMमुंबई: पुढारी ऑनलाईन

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने दिलीपकुमार बुधवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत संसर्ग झाल्याने 95 वर्षीय दिलीपकुमार यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आणले जाते. आज त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने दिलीपकुमार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. 

Image may contain: 1 person, text

सायरा बानो यांनी दिलीपकुमार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. छातीत संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सायरा बानो यांनी म्हटले आहे.