Tue, Jul 16, 2019 22:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोहराबुद्दीन शेख प्रकरणात सीबीआयने नाहक गोवले

सोहराबुद्दीन शेख प्रकरणात सीबीआयने नाहक गोवले

Published On: Feb 25 2018 1:46AM | Last Updated: Feb 25 2018 1:44AMमुंबई : प्रतिनिधी 

बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गुजरातचे आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांनी आपल्याला सीबीआयने नाहक गोवले असा दावा उच्च न्यायालयात केला. त्यांच्यावतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. महेश जेठमलांनी यांनी हा दावा केला. 

पांडीयन यांनी गुप्तचर पथकात काम करताना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व पाकिस्तानच्या आयएसआयशी मुकाबला केला. परंतु सीबीआयने खोटी चौकशी करून या प्रकरणात अडकविण्यात आले, असा गंभीर आरोपही केला.

या खटल्यातून आरोपींची निर्दोष मुक्ताता करण्याच्या निर्णयाला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेखने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.