Tue, Feb 19, 2019 23:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदित्य ठाकरेंकडून वर्सोवा किनारी स्वच्छता

आदित्य ठाकरेंकडून वर्सोवा किनारी स्वच्छता

Published On: Mar 04 2018 2:09AM | Last Updated: Mar 04 2018 2:09AMमुंबई :

2 ऑक्टोबर 2015 पासून अफरोझ शाह यांनी वर्सोवा समुद्र किनारा स्वच्छ करण्याचे व्रत हाती घेतले असून शनिवारी या मोहीमेचे तब्बल 124 आठवडे पूर्ण झाले. 124 व्या आठवड्याच्या स्वच्छता मोहीमेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सहभागी घेऊन स्वत: कचरा उचलत 

वर्सोवा किनार्‍यावर स्वच्छता केली. शनिवारी अर्धा डझन शाळा आणि महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. स्थानिक वर्सोवा बीच रेसिंडेन्ट आणि सातबंगला सागर कुटीर येथील अनेक स्वयंसेवकसुद्धा या मोहिमेत सहभागी झाले होते.