Wed, Apr 24, 2019 11:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वसईत सख्या लहान भावाकडून बहिणीची हत्या

वसईत सख्या लहान भावाकडून बहिणीची हत्या

Published On: Aug 28 2018 4:58PM | Last Updated: Aug 28 2018 4:58PMवसई : प्रतिनिधी

वसईत सख्या लहान अल्पवयीन भावानेच  मोठ्या बहिणीची गळा आवळून हत्या केली आहे. बहीण मित्रासोबत जास्त राहते, आणि फोनवर जास्तवेळ बोलते, त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून  हत्या केली असल्याचे उघड झाले आहे.

वसईतील पाळणापाडा येथील दुमडा चाळीत काल २७ ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. काजल पगारे असे हत्या झालेल्या बहिणीचे नाव असून ती १८ वर्षांची आहे तर हत्या करणारा आरोपी भाऊ हा १७ वर्षांचा आहे. आरोपी विरोधात वालीव पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्या आले आहे.