Sat, Sep 21, 2019 04:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वसई-विरार महापौरपदी रुपेश जाधव निश्चित

वसई-विरार महापौरपदी रुपेश जाधव निश्चित

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:43AM

बुकमार्क करा

नालासोपारा :

वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी बहुजन विकास आघाडीचे रुपेश जाधव आणि उपमहापौरपदी प्रकाश रॉ़ड्रिक्स याची बिनविरोध निवड होणार असल्याचे निश्चित झाले असून केवळ औपचारिकता बाकी आहे. शनिवारी केवळ या दोघांचेच अर्ज दाखल झाले आहेत. वसई-विरार महापालिकेच्या विद्यमान महापौर प्रविणा ठाकूर आणि उपमहापौर उमेश नाईक यांच्या पदाचा कालावधी 28 डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड 27 डिसेंबर रोजी होणार आहे. शनिवार या दोन्ही पदासांठी अर्ज भरायचे होते. यावेळी महापौर पद हे खुल्या वर्गासाठी आहे. बहुजन विकास आघाडीतर्फे महापौरपदासाठी  प्रभाग समिती-ब चे सभापती रुपेश जाधव आणि उपमहापौरपदासाठी सभापती प्रकाश रॉड्रिक्स यांनी अर्ज दाखल केले.

त्यांच्याविरोधात सेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांपैकी कुणीही अर्ज दाखल न केल्याने या दोघांची निवड बिनविरोध होणार आहे. मंगळवार 27 डिसेंबर रोजी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी अर्जांची छाननी केल्यानंतर जाधव आणि रॉड्रिक्स यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. रुपेश जाधव यांनी यापूर्वी उपमहापौरपद भूषविले आहे. या वेळी बविआचे अध्यक्ष आम.हितेंद्र ठाकूर यांनी धक्कातंत्राचा वापर केला असून महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी असताना महापौरपदाची माळ मागासवर्गीय समाजाच्या तर उपमहापौरपदाची माळ ख्रिश्चन समाजाच्या गळ्यात घातली आहे.