Thu, Jul 18, 2019 10:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डिसेंबरपासून वसई-ठाणे-कल्याण जलवाहतूक

डिसेंबरपासून वसई-ठाणे-कल्याण जलवाहतूक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी 

पहिल्या टप्प्यातील जलवाहतुकीची पहिली फेरी डिसेंबर 2018 पर्यंत सुरू होणार असल्याचा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे. जलवाहतुकीचा अंतिम आराखडा केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून त्याला एका आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या कामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवण्यात येणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. 

पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 600 कोटींचा खर्च अपेक्षित असून, तो केंद्राकडून करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रामध्ये सोमवारी अंतर्गत जलवाहतुकीचे सादरीकरण महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे सीईओ विक्रम कुमार, गोवा आणि कोची शिपयार्डचे अधिकारी तसचे इतर महापालिकांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पहिल्या टप्प्यात वसई-ठाणे-कल्याण, दुसर्‍या टप्प्यात ठाणे ते मुंबई, तर तिसर्‍या टप्प्यात ठाणे ते नवी मुंबई अशी जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. 

पहिल्या टप्प्यातील जलवाहतुकीचा 45 किमीचा मार्ग असून यामुळे 2 तास 70 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी वसई, मीरा-भाईंदर, ठाणे आणि कल्याण या ठिकाणी 10 जेटी बांधण्यात येणार आहेत. नागला बंदर, कोलशेत आणि पारसिक या ठिकाणी या तीन जेटी बांधण्यात येणार आहेत. सोमवारच्या सादरीकरणात जलवाहतुकीचे मार्ग, जेटींची संख्या, भाडे यासंदर्भात चर्चा करण्यात आली.   

पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून 8 ते 10 कॅपिसीटीच्या दोन ते तीन बोट घेतल्या जाणार असून त्या डिसेंबरअखेरपर्यंत धावतील. खासगी संस्थेच्या माध्यमातून ही सेवा चालवली जाणार असल्याचे आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

Tags : mumbai news, Vasai Thane Kalyan,  water transport,  December, 


  •