Sat, Feb 23, 2019 10:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वसईरोड-वाराणसी गाडी लवकरच

वसईरोड-वाराणसी गाडी लवकरच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वसई : प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यातील उत्तर भारतीयांची लोकसंख्या लक्षात घेऊन खा. चिंतामण वनगा यांनी वसई रोड व्हाया कल्याण-वाराणसी अशी गाडी सुरू करण्यासंदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून मागणी केली होती. त्याबाबत रेल्वेच्या उच्च स्तरावर हालचाली सुरू झाल्या असून, त्याचे पत्रही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी खासदार चिंतामण वनगा यांना पाठवले आहे. यामुळे ही गाडी लवकरच सुरु होणार आहे. 

गेल्या 10 ते 15 वर्षांत पालघर जिल्ह्यात उत्तर भारतीयांची संख्या प्रचंड वाढली आहे. तारापुरच्या औद्योगिक क्षेत्रात रोजगारानिमित्त हजारो उत्तर भारतीय पालघर, बोईसर व अन्य परिसरात स्थलांतरित झाले आहेत. त्यांना आपल्या मुळगावी जाण्यासाठी दादर, कुर्ला टर्मिनस किंवा सीएसटी गाठावे लागते. यात वेळ व पैश्याचा अपव्यय होतो. त्यामुळे वसईरोडहून वाराणसी अशी गाडी सुरू करण्याची मागणी चिंतामण वनगा यांच्याकडे केली होती. 

खा.वनगा यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्यांच्या या पत्राला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल,असे खा. वनगा यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.