Thu, Apr 25, 2019 13:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारी बांधकामांनाही टिकाऊ साहित्य वापरा

सरकारी बांधकामांनाही टिकाऊ साहित्य वापरा

Published On: Jan 08 2018 1:27AM | Last Updated: Jan 08 2018 12:39AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

सहकार चळवळीच्या या यात सहकार क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी, सभासद, अधिकारी, कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग असतो. त्यामुळे उत्कृष्ट काम करणार्‍या सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार असून या पुरस्कारासाठी मुंबई पश्‍चिम उपनगर जिल्ह्याचे अधिनस्त कार्यक्षेत्रातील सहकारी क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, (3), मुंबई, श्री. महेंद्र म्हस्के यांचेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना श्री. महेंद्र म्हस्के म्हणाले की, देशातील सहकार चळवळीच्या विकासात राज्याचे योगदान आहे. या चळवळीच्या राज्यातील आर्थिक आणि सामाजिक विकासावर सकारात्मक व दुरगामी परिणाम झालेला आहे. सहकार चळवळीच्या या यशात सहकार क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी, सभासद, अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग असतो. सहकारी चळवळीच्या विकासात ज्या सहकारी संस्थांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यातील उत्कृष्ट सहकारी संस्थांना त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार देवून शासनामार्फत गौरव करण्यात येणार आहेे.

शासन निर्णयानुसार सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहकारी संस्थांना नऊ गटात पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. प्राथमिक कृषी पत पुरवठा संस्थांना सहकारी भूषण तीन आणि सहकार निष्ठ एक असे एकूण सहा पुरस्कार; नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था व पगारदार नोकरांच्या पतसंस्थांना सहा पुरस्कार; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांना तीन पुरस्कार; नागरी सहकारी बँकांना चार पुरस्कार असे दोन्ही वर्गवारीतील पुरस्कारांचे स्वरूप आहे. हे सर्व पुरस्कार एका महसूल विभागातून एक पुरस्कार असे दिले जाणार आहेत. सहकारी साखर कारखाने, सहकार सुत गिरणी, सहकारी संघ, गृहनिर्माण संस्था, औद्योगिक संस्था, हातभार संस्था व यंत्रमाग संस्था, उपसा सिंचन संस्था व इतर संस्था, फळे भाजीपाला संस्था, खरेदी विक्री संघ, प्रक्रिय संस्था व ग्राहक संस्था, प्राथमिक दूध संघ संस्था, कुक्‍कटपालन संस्था, मत्स्य पालन संस्था व पशुसंवर्धन संस्थांचाही पुरस्कारांमध्ये समावेश आहे. पुरस्कारांची एकूण संख्या  45 असून त्यामध्ये सहकार भूषण 21 व सहकार निष्ठ 23 अशी विभागणी करण्यात आली आहे.