Fri, Feb 22, 2019 23:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सच वापरा !

खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सच वापरा !

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 12:47AMमुंबई : प्रतिनिधी 

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी केवळ कोल्डमिक्सचाच वापर करण्यात यावा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त विजय सिंगल यांनी काढले आहेत.  रस्ते विभागाचे कार्यकारी आणि सहाय्यक अभियंता यांनी त्यांना नेमून दिलेल्या विभागांमधील किमान 10 टक्के खराब रस्त्यांची पाहणी केलीच पाहिजे, असेही सूचवण्यात आले आहे. 

पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंगल यांनी शुक्रवारी अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत या सूचना दिल्या आहेत. फक्त बंद बॅगमधून आणलेल्या कोल्डमिक्सचा वापर पावसात करावा, वेष्टन असल्याशिवाय कोणत्याही रस्त्यावर त्याचा वापर करता कामा नये. पाऊस पडत असतानाच कोल्डमिक्सचा वापर करावा, कोल्डमिक्स आणि वापरलेल्या सामग्रीविषयी कागदपत्रांचा लेखाजोखा ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. 

खड्ड्याची खोली 25 मिमीपेक्षा जास्त असताना कोल्डमिक्सचे थर उत्पादकांच्या निर्देशानुसार पसरवावेत. हमी कालावधीतील प्रकल्प रस्त्यांची देखभालीची जबाबदारी कंत्राटदाराचीच आहे. त्याच्या कामाच्या तपासण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंत्यांची असल्याचेही सिंगल यांनी स्पष्ट केले.