Sun, Nov 18, 2018 21:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बनावट फेसबुक अकाऊंटवर अश्‍लील व्हिडीओ अपलोड

बनावट फेसबुक अकाऊंटवर अश्‍लील व्हिडीओ अपलोड

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 12:54AMमुंबई : प्रतिनिधी

विलेपार्लेमधील 29 आणि 31 वर्षीय दोघा बहिणींचे एका नराधमाने फेसबूकवरुन फोटो चोरी करत त्याआधारे बनावट प्रोफाईल तयार करुन या अकाउंटवर अश्‍लिल फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, त्याने तयार केलेल्या अकाऊंटवरुन दोघींच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना फ्रेन्डरिक्वेस्ट पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत विलेपार्ले पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले परिसरात या दोघी बहिणी राहात आहेत. त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरुन आरोपीने प्रोफाईल फोटो चोरी केले. त्यानंतर याच फोटोंच्या आधारे बनावट फेसबूक अकाऊंट उघडले आणि त्यावर अश्‍लिल व्हिडीओ, तसेच अश्‍लिल फोटो अपलोड केले. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, त्याने या दोन्ही बहिणींची नावे आणि पत्ता त्यावर पोस्ट करुन मित्र-मैत्रिणींसह नातेवाईकांना फ्रेन्डरिक्वेस्ट पाठविल्या. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. अखेर या दोघा बहिणींनी विलेपार्ले पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अज्ञाताविरोधात भादंवी कलम 419 आणि 500 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.