Tue, Jun 18, 2019 23:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेना पदाधिकार्‍याचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य

सेना पदाधिकार्‍याचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य

Published On: Aug 03 2018 2:18AM | Last Updated: Aug 03 2018 1:41AMडोंबिवली/कल्याण : वार्ताहर

हुंड्यासाठी शारीरिक-मानसिक छळ करून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकार्‍याविरोधात कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. संजय मोरे असे या पदाधिकार्‍याचे नाव असून, तो युवा सेनेचा अधिकारी आहे. शिवसेना पदाधिकार्‍याच्या या घृणास्पद कृत्याने कल्याणात एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण रपूर्वेतील विजय नगर परिसरात सिंहगड चाळीत संजय मोरे राहतो. घरातून हुसकावून लावलेली ही 30 वर्षीय विवाहिता सध्या पश्चिम डोंबिवलीत आपल्या माता-पित्यांकडे राहत आहे. पाच महिन्यांपूर्वी (19 फेब्रुवारी रोजी) संजय मोरे याच्याशी आपले पारंपरिक पद्धतीने लग्न झाले. मात्र लग्नाच्या दुसर्‍या दिवसापासून सासरची मंडळी आपला शारीरिक आणि मानसिक छळ करू लागली. लग्नाच्यावेळी माहेरून आपणास 2 मंगळसूत्रे, 3 जोड कर्णफुले, चार बांगड्या, 2 अंगठ्या, 1 नथ असे सोन्याचे अलंकार देण्यात आले होते. या दागिन्यांचा सासरच्यांनी अपहार केला. पती संजय हा आपल्यावर गेल्या 5 महिन्यांपासून अत्याचार करत होता. त्रास देण्यासाठी तो आपल्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करीत होता. पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला विकृत प्रसंग कथन केला. 

त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून पती-संजय, सासरा जयवंत आणि सासू वनिता यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 498 (अ) , 377, 323, 504, 506 व 34 या कलमान्वये मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करून संजय मोरे याला बुधवारी रात्री अटक केली. गुरुवारी दुपारी त्याला कल्याण कोर्टाने 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.