Fri, Apr 26, 2019 09:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मालाड येथे रेल्वे ट्रॅकवर अज्ञात इसमाची हत्या

मालाड येथे रेल्वे ट्रॅकवर अज्ञात इसमाची हत्या

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 1:17AMमुंबई : प्रतिनिधी

मालाड-गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात इसमाची तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आली. मृत इसमाची ओळख पटली नसून त्याचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या मारेकर्‍याचा शोध सुरु केला आहे. 

गोरेगाव-मालाड रेल्वे स्थानकादरम्यान चिंचोली फाटक आहे. रविवारी दुपारी बारा वाजता रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जाणार्‍या नाल्याजवळ एका इसमाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला असल्याची माहिती मुख्य नियंत्रण कक्षातून माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर मालाड, गुन्हे शाखा आणि बोरिवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एका 40 ते 45 वर्षांच्या अज्ञात इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याचे दोन्ही हातपाय बांधले होते तसेच त्याच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने भोसकल्याच्या जखमा होत्या. बोरिवली रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकर्‍याचा शोध सुरु केला आहे. त्यासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.