Fri, Jul 19, 2019 07:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमध्ये अज्ञाताचा खून

कल्याणमध्ये अज्ञाताचा खून

Published On: Mar 18 2018 8:17PM | Last Updated: Mar 18 2018 7:22PMडोंबिवली : प्रतिनिधी

कल्याण पश्चिमेतील रेल्वे हॉस्पिटल रोडवर अज्ञाताचा खून झाल्याची घटना घडली आहे.  वालधुनी उड्डाण पुलाच्या खाली रेल्वे पोल क्रमांक 33 - 34 येथे या युवकाचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे वय 35 ते 40 दरम्यान असल्याचा अंदाज आहे. काल ( शनिवार, १७ मार्च)ला ही घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, कल्याण पश्चिमेतील रेल्वे रोडवर वालधुनी उड्डाण पुलाच्या खाली रेल्वे काल ( शनिवार, १७ मार्च)ला एक युवक मृत अवस्थेत आढळून आला. या मृत व्यक्तीच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यामुळे मारेकऱ्यांनी सदर व्यक्तीच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून त्याला ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 
 

Tags : Mumbai, Mumbai news, Dombivli, Kalyan Crime, murder, Unknown person murder,