Tue, Mar 19, 2019 11:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठ : पत्रकारितेतील अभ्यासक्रम बंद होणार

मुंबई विद्यापीठ : पत्रकारितेतील अभ्यासक्रम बंद होणार

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 1:08AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी तडकाफडकी पाच अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी संख्येअभावी हे अभ्यासक्रम बंद करण्याचे कारण पुढे करत पूर्वकल्पना न देता हे अभ्यासक्रम बंद करण्याविरोधात आता युवा सेना आक्रमक झाली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागातर्फे अनेक अभ्यासक्रम चालविली जातात. यातील पदवी अभ्यासक्रमाच्या जवळपास सर्वच अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची चांगली पंसती असते. मात्र गेल्या गेल्या काही दिवसांपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे विभागाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पाच अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. ज्यात मास्टर ऑफ आर्टस (कॅम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नलिझम), मास्टर ऑफ आर्टस (पब्लिक रिलेशन), मास्टर ऑफ आर्टस (इलेक्शन मिडीया), मास्टर ऑफ आर्टस (टेलिव्हिजन स्टडीज) आणि मास्टर ऑफ आर्टस (फ्लिम स्टडीज) हे अभ्यासक्रम एक वर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अभ्यासक्रम तडकाफडकी हे अभ्यासक्रम बंद केल्याने युवा सेनेकडून याविरोधात आता विद्यापीठाकडे तक्रार केली आहे. युवा सेनेचे कार्यकारणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी यासंदर्भात कुलगुरुकडे यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले आहे.

मुंबई विद्यापीठाने नुकताच बृहत आराखडाच्या माध्यमातून कौशल्यभिमुख अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर दुसरीकडे पत्रकारिता विभागाने महत्वाचे असे तीन अभ्यासक्रम बंद करणे ही संतापजनक बाब आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम पुन्हा सुरु करण्याची मागणी आम्ही केली असून याकडे दुर्लक्ष केल्यास युवा सेनेच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा साईनाथ दुर्गे यांनी दिला आहे.