Thu, Jul 18, 2019 00:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंब्य्रात अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा  केला पर्दाफाश

मुंब्य्रात अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा  केला पर्दाफाश

Published On: Aug 15 2018 1:52AM | Last Updated: Aug 15 2018 1:52AMठाणे : प्रतिनिधी

बेकायदा टेलिफोन एक्सचेंज चालवणार्‍या तिघांना सोमवारी मुंब्रा पोलिसांनी अटक केली. यावेळी एक देशी बनावटीचे पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, सीमकार्ड्स, वायफाय राऊटर असा एकूण 14 लाख रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. या टेलिफोन एक्सचेंजचा अंडरवल्डसोबत काही संपर्क झाला आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.

शेहजाद निसार शेख (30), शकील इकलाख अहमद शेख (40), मोहमंद हलीम मुक्तार अहमद खान (26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून वसीलउल्ला इकलाख अहमद शेख याचा पोलीस शोध घेत आहे. मुंब्रा येथील कौसा भागात चार ठिकाणी अनधिकृतरित्या टेलिफोन एक्सचेंज चालवण्यात येत असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर आणि पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी पथके तयार करून टेलिफोन एक्सचेंजवर सोमवारी छापा घातला. यात पोलिसांनी शेहजादक, शकील आणि मोहमद या तिघांना अटक केली. 

गेल्या वर्षभरापासून हे तिघे राहत्या घरातून टेेलिफोन एक्सचेंज चालवत होते, याद्वारे दुबईत फोन करण्यात येत होते. त्यामुळे या टेलिफोन एक्सचेंजच्या माध्यमातून अंडरवर्ल्डशी काही संपर्क झाला होता का? याचा तपास पोलीस करीत आहेत. या तिघांकडून पोलिसांनी 19 सीम बॉक्स मशीन, 37 वायफाय राऊटर, व्होडाफोन आणि एअरटेलचे 291 सीमकार्ड आणि एक पिस्तुल जप्त केले.