Sun, Jan 20, 2019 16:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीतील चायना गेट, टॅप रेस्टॉरंटचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

अंधेरीतील चायना गेट, टॅप रेस्टॉरंटचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

Published On: Jan 08 2018 1:27AM | Last Updated: Jan 08 2018 1:13AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

अंधेरी पश्चिम येथील न्यू लिंक रोडवरील चायना गेट रेस्टॉरंट व टॅप रेस्टॉरंट मधील 2 हजार चौरस फुटांपेक्षा मोठे अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे हॉटेल व्यवसायिक चांगलेच हादरले आहेत.

अंधेरी पश्चिम परिसरात असणार्‍या न्यू लिंक रोडवरील रॉयल प्लाझा को-ऑपरेटिव्ह सोसायटी मधील तळमजल्यावर असणार्‍या टॅप रेस्टॉरंटच्या मागील व पुढील बाजूस अनधिकृत शेड उभारून त्याचा डायनिंग एरियासारखा वापर केला जात होता. तर याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर असणार्‍या चायना गेट रेस्टॉरंटमध्ये देखील अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. याबाबत या दोन्ही उपाहारगृहांना मुंबई महापालिका अधिनियम 351 नुसार यापूर्वीच नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही उपाहारगृहांतील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आल्याचे के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.