Tue, Jul 16, 2019 22:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › NCPची खेळी; चुलत बहिणींत होणार काँटे की टक्‍कर!

चुलत बहिणींत होणार काँटे की टक्‍कर!

Published On: Mar 16 2018 1:26AM | Last Updated: Mar 16 2018 9:07AMउल्हासनगर :

उल्हासनगर महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका पूजा कौर लभाना यांचे पद जातप्रमाणपत्रामुळे रद्द झाल्याने प्रभाग 17 मध्ये 6 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. विशेष म्हणजे पूजा कौर यांची तक्रार ज्यांनी केली होती, त्या काँग्रेसच्या पराभूत उमेदवार माजी उपमहापौर जया साधवानी यांच्या चुलत बहिणीला उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादीने अनपेक्षित खेळी खेळली आहे. काँग्रेसकडून पुन्हा जया साधवानी यांनी उमेदवारी जाहीर झाल्यास दोन चुलत बहिणीत काट्याची लढाई होण्याची शक्यता आहे. 

शिक्षिका असलेल्या पूजा कौर यांनी 2017 च्या उल्हासनगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवताना काँग्रेसच्या दिग्गज उमेदवार तथा माजी उपमहापौर जया साधवानी यांचा पराभव केला होता. मात्र पूजा कौर यांचे ओबीसी जातप्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार साधवानी यांनी जात पडताळणी समितीकडे केल्यावर आणि त्यात तथ्य आढळल्यावर समितीने पूजा कौर यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. त्यानुसार 6 एप्रिलला प्रभाग 17 मध्ये पोटनिवडणूक होणार आहे. 

या निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेसने अद्यापही उमेदवारी जाहीर केली नसताना राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव तसेच जिल्हा निरीक्षक सुधाकर वड्डे, पालिकेतील गटनेते भारत गंगोत्री यांनी जया साधवानी यांची चुलत बहीण सूमन सचदेव यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी उपाध्यक्ष भीमसेन मोरे, राष्ट्रवादीचे माजी युवक अध्यक्ष तथा वणवा समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष निलेश पवार, विशाल माखिजा, माधव बगाडे, नगरसेविका सुनिता बगाडे, माजी नगरसेविका पूजाकौर लभाना आदी उपस्थित होते.