Sat, Jan 19, 2019 02:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्फोटकाच्या अफवेने उद्योगनगरी एक्स्प्रेस थांबवली

स्फोटकाच्या अफवेने उद्योगनगरी एक्स्प्रेस थांबवली

Published On: Jan 29 2018 1:30AM | Last Updated: Jan 29 2018 1:03AMकसारा : वार्ताहर

मुंबईहून बिहारला जाणार्‍या उद्योगनगरी एक्स्प्रेस स्फोटक असल्याचा निनावी फोन आल्याने तिला खर्डी स्थानकावर थांबवण्यात आले. रविवारी सायंकाळी 6.35 वाजता रेल्वे कंट्रोल रूममध्ये हा फोन आल्यानंतर एक्स्प्रेसला थांबवण्यात आले. प्रवाशांना तातडीने स्थानकात उतरवले गेले. तपासणीनंतर ही अफवा असल्याचे निष्पन्‍न झाले.

ठाणे शहर बॉम्बशोधक पथकाने 2 तास तपासणी केली. तपासणीसाठी कल्याण येथून श्‍वानपथकही मागविण्यात आले. मात्र कुठलेही स्फोटक न आढळल्याने एक्स्प्रेस 9.24 ला सोडण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खर्डी स्थानकात स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस, राज्य राखीव दल यांची पथके  दाखल झाली होती. खर्डीला छावणीचे स्वरूप आले होते.