सत्तास्थापनेसाठी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच : राऊत

Last Updated: Nov 08 2019 5:59PM
Responsive image


पुढारी ऑनलाईन डेस्क

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापालांची भेट घेऊन पदाचा राजीनामा दिला आणि पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीका केली. या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या येणारे नवे सरकार हे भाजपच्या नेतृत्वाखालील असेल या दाव्यावरुन चिमटा काढला. त्यांनी सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा ही दिल्या, शिवसेनेने मनात आणले तर आता सरकार स्थापन करु आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे वक्तव्य केले. 

देवेंद्र फडणवीस यांनी सत्तास्थापनेबाबतच्या चर्चा भाजपने नाही तर शिवसेनेने थांबवली आहे असा आरोप मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर संजय राऊत यांनी लगेचच शरद पवार यांच्या बंगल्याबाहेर येत पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी 'फडणवीस यांच्या बोलण्याला उत्तर उद्धव ठाकरेच देतील तसेच अडीच वर्षांच्या मुद्दावर चर्चा झाली होती. परंतु ते आता मान्य करायला तयार नाहीत. मी आणि शरद पवार दोघांनी देवेंद्र फडणवीस यांचा शब्दनी शब्द ऐकला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर भाजप सरकार स्थापन करणार असतील तर त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. शिवसेनेने ठरवलं तर मुख्यंमत्री शिनसेनेचाच होणार.' असे वक्तव्य केले.  

दरम्यान, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. भाजपकडून जरी युती तुटल्याची औपचारिक घोषणा केली नसली तरी त्यांनी चर्चेसाठी त्यांना आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच औपचारिक पत्रकार परिषद घेत आहेत. यापूर्वी शिवसेनेकडून संजय राऊतच बोलत होते. अधून मधून एकनाथ शिंदे आमि रामदास कदम यांनीही पत्रकारांना प्रतिक्रिया दिली होती. 
 

एकनाथ खडसे म्हणतात, 'म्हणून' ८० तासांसाठी फडणवीस मुख्यमंत्री झाले!


भाजपमधील खदखद गोपीनाथ गडावरून चव्ह्याट्यावर; चंद्रकातदादांनी करून दिली कुटुंबाची आठवण!


मी पक्ष सोडणार नाही; पक्षाने काय तो निर्णय घ्‍यावा : पंकजा मुंडे


गोपीनाथ गडावरून चंद्रकातदादांची 'नाराज' नाथाभाऊंना कळकळीची विनंती!


पंकजा मुंडेंचा पराभव स्वकीयांनीच ठरवून केला; एकनाथ खडसेंचे टिकास्त्र


मुंबई : केक खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा


बापाने केला पोटच्या मुलीवर अत्याचार (video)


'रिझवान’चा संगीत अनावरण सोहळा उत्साहात संपन्न (video)   


पंकजा मुंडेंनी शक्तीप्रदर्शनाने कोणती 'जाहीर' मागणी केली?


#CAB; नागरिकत्व विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव; मुस्लीम लीगकडून याचिका दाखल