Tue, Mar 26, 2019 11:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देश बदल रहा है!, नारा फक्त मोदींपुरताच : उद्धव ठाकरे

देश बदल रहा है!, नारा फक्त मोदींपुरताच : उद्धव ठाकरे

Published On: May 23 2018 8:36PM | Last Updated: May 23 2018 10:24PMमुंबई : पुढारी ऑनलाईन  

देश बदल रहा है!  हा नारा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींपुरताच मर्यादित असल्याची घणाघाती टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. पंतप्रधान मोदींचा आज रशिया उद्या चीन आणि परवा आणखी एखादा नवा देश असा प्रवास सुरु आहे. त्यामुळे रोज नवा देश हेच भाजप सरकारच्या काळात देश बदल रहा है! चे उदाहरण असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देऊन भाजपने बेईमानी केल्याचा आरोपही उद्धव यांनी यावेळी केला. 'अच्छे दिन'ला जुमला म्हणने याला बेईमानी म्हणतात असा टोमणाही त्यांनी लगावला. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना उमेदवार श्रीनिवास चिंतामण वनगा यांच्या प्रचारार्थ वसंत नगरी ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

जे भाजपा अटल बिहारी वाजपेयींना न्याय देऊ शकले नाही ते वणगा कुटुंबियांना न्याय काय देणार? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. श्रीनिवासला भाजपने उमेदवारी दिली असती तर मी स्वत: प्रचाराला आला असतो.पण भाजपला वनगा कुटुंबियांचा विसर पडला आहे. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला अश्रूंची किंमत कळणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी श्रीनिवासला शंभर टक्के विजय मिळेल असा विश्वासही वर्तवला.

मुख्यमंत्री इथे येऊन कुत्रा मांजर म्हणाले. ते कुणाला म्हणाले माहित नाही. मात्र एक खरे की कुत्रा मांजरेही कपाळाला हात मारत असतील. आता लोक पुढच्या निवडणुकीची वाट पाहत आहेत. अबकी बार  फुसका बार चालणार नाही, असा टोलाही उद्धव यांनी लगावला. मुख्यमंत्री म्हणतात शिवसेनेने पाठीत वार केला पण हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का?  लोकसभा निवडणूक आधीच येणार हे माहित असतानाच त्यांनी गावित यांच्याशी बोलून ठेवले, मग त्यांनी श्रीनिवास वनगा  याना का सांगितले नाही. मुख्यमंत्र्यांच्या मनात होते तर त्यांनी मोदींसारखे रेडिओवर का नाही बोलून दाखवले असा खोचक प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी भाजपच्या बेईमानीचा दाखलाही दिला. १५ लाख बँकेत जमा होणार, 'अछे  दिन' येणार हे सांगणे आणि प्रत्यक्षात काहीच न होणे यालाच बेईमानी  म्हणतात.

वनगा कुटुंबाला विचारा आम्ही त्यांना काही लालूच दिले का? तो परिवार माझ्याकडे आला आणि आम्ही त्यांचे अश्रू पहिले, आम्ही अश्रूंची किंमत केली. तुम्ही त्यांना काय दिले त्यांनी कधी स्वतःकडे पहिले नाही, ३५ ते ४० वर्ष वनगा यांनी  केवळ भगवा हातात धरला. मात्र,  तुम्ही त्यांना त्यांच्या परिवाराला काहीच दिले नाही. तुम्ही वनगाच्या दुःखद निधनांनंतर त्यांना वाऱ्यावर सोडले ते बिचारे रडले तरी तुम्ही दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी भाजपवर केला.   

आपल्या पक्षाचा दाखला देत उद्धव म्हणाले की, कृष्ण घोडा यांच्या मृत्यूनंतर मी लगेच त्यांचा मुलगा अमितला बोलावले आणि विचारले. तुम्ही तसे का नाही केले. आम्ही गिरकरताई भाजपच्या नगरसेविका असूनही त्याच्या दुःखद निधनानंतर  कुटुंबियांच्या पाठिशी उभे राहिलो. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर विश्वजित कदम यांना पाठिंबा दिल्याचे सांगत मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडून आम्हाला शिकायची गरज नाही असा टोलाही उद्धव यांनी यावेळी लगावला. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे हे लक्षात ठेवा, तुमच्या सारखे आम्ही त्यांना केवळ निवडणुकीसाठी वंदन करत नाही, असेही त्यांनी भाजपला सुनावले.