Fri, Jan 18, 2019 09:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्धव-मुरली मनोहर जोशींमध्ये गुफ्तगू

उद्धव-मुरली मनोहर जोशींमध्ये गुफ्तगू

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 1:27AMमुंबई : खास प्रतिनिधी 

शिवसेनेकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांयासह भाजपावर अत्यंत जहरी  भाषेत सातत्याने टीका होत असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर सेनेच्या भाजपाविरोधाची धार अधिकच तीक्ष्ण झाली आहे. मुखपत्रातून रोज भाजपाचे वाभाडे काढणार्‍या शिवसेनेने लोकसभेत अविश्वास प्रस्तावाच्या वेळी मात्र तटस्थ भूमिका घेऊन भाजपाला आणखी कोड्यात टाकले आहे. 

राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीतही सेनेने भाजपाप्रणित रालोआच्या उमेदवारालाच पाठिंबा दिला होता. त्यासाटी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी स्वतः उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. 

या पार्श्वभूमीवर भाजपानेते मुरली मनोहर जोशी यांची मातोश्री भेट हा त्याच प्रयतत्नाचा एक भाग असू शकतो, अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि मुरली मनोहर जोशी यांच्यात तासभर झालेल्या चर्चेचा तपशील मात्र मिळू शकला नाही. मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती, असे सेनेकडून सांगण्यात आले.