Wed, Apr 24, 2019 07:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धक्‍कादायक ! मारिया यांच्या विरोधानंतरही विमानाचं उड्‍डाण

धक्‍कादायक ! मारिया यांच्या विरोधानंतरही विमानाचं उड्‍डाण

Published On: Jun 28 2018 7:58PM | Last Updated: Jun 28 2018 8:19PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

घाटकोपर येथे विमान अपघाताबाबत धक्‍कादायक आरोप पुढे आले आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या विमानाच्या पायलट मारिया झुबेर यांचे पती प्रभात कथुरिया यांनी  खराब हवामानामुळे मारियांचा विमान उड्‍डाणास विरोध असतनाही कंपनीने उड्‍डाणास भाग पाडल्याचा दावा केला आहे. मारिया आणि प्रदीप राजपूत यांनी हवामान खराब असल्याचे सांगितले होते. तरीही यूवाय एव्‍हिएशन कंपनीने आग्रह केला, असे प्रभात यांनी सांगितले. 

►घाटकोपर अपघात: पायलट मरियांच्या शौर्याला सलाम

मारिया यांच्याकडे १ हजार तास विमान उड्‍डाणाचा अनुभव आहे. खराब हवामान असल्याचे सांगूनही कंपनीचा आग्रह धरला. त्यासाठी मारिया यांनी सकाळी ८ वाजताच घर सोडलं होतं. चाचणीसाठी दुपारी दीडच्या सुमारास जुहू हेलिपॅडवरून विमानानं टेक ऑफ केलं. मात्र घाटकोपर्यंत पोहोचताच विमान दुर्घटनाग्रस्‍त झालं आणि कोसळलं, असेही प्रभात म्‍हणाले. 

►मुंबई: घाटकोपर परिसरात चार्टर्ड विमान कोसळले, वैमानिकासह 5 जणांचा मृत्यू

प्रभात यांनी मारियांना दुपारी एक वाजता where r u? असा मेसेज केला होता. परंतु, त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ वाट पाहिली तरीही कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे भीती वाटू लागली. शेवटी टीव्‍हीवर अपघाताची बातमी बघून धक्‍का बसल्याचे प्रभात यांनी सांगितले. 

►जाणून घ्या : विमानाचा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? 

दरम्यान, दुर्घटनाग्रस्‍त झालेले व्‍हीटी यूपीझेड, किंग एअर सी-९० हे चार्टर्ड विमान उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीचे विमान होते. मात्र उत्तर प्रदेश सरकारकडून २०१४ मध्ये यूवाय एव्‍हिएशन कंपनीने हे विमान विकत घेतले होते. या विमान अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून अपघाताबाबत सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे.