Wed, Nov 21, 2018 03:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › यूटीएस अ‍ॅपचा पश्‍चिम रेल्वेकडून प्रसार

यूटीएस अ‍ॅपचा पश्‍चिम रेल्वेकडून प्रसार

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 12:57AMमुंबई : प्रतिनिधी

देश डिजिटलायझेशन्च्या दिशेने चालला आहे. सर्वच गोष्टी डिजिटल झालेल्या असताना तिकीटसुद्धा अ‍ॅपद्वारे काढता यावी, यासाठी मुंबई रेल्वे बोर्डाकडून यूटीएस नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले. या अ‍ॅपचा पश्‍चिम रेल्वेकडून विविध स्थानकांवर प्रसार करण्याची मोहीम दहा दिवस राबवण्यात आली. हे अ‍ॅप प्ले स्टोरवरून डाऊनलोड केल्यानंतर त्याद्वारे तिकीट काढताना दरवेळी आर व्हॅलेट रिचार्ज केल्यास 5 टक्के बोनस देण्यात येणार आहे.

या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना डिजिटल तिकिटिंगशी जोडण्याचा मानस असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. सुरुवातीला हे अ‍ॅप वापरत असताना नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेता पश्चिम रेल्वेकडून यूटीएसच्या प्रचारासाठी विशेष अभियान आयोजित करण्यात आले होते.

2017 च्या तुलनेत 2018 मध्ये डिजिटल तिकीट काढणार्‍यांमध्ये 220 टक्क्यांची वाढ झाली आहे. ज्यामुळे तिकीट खिडक्यांवरचा भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. यावर्षी दिलेल्या अतिरिक्त सुविधांचा वापर करत जास्तीत जास्त लोकांनी यूटीएस हे अ‍ॅप वापरण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.