Sun, Jul 21, 2019 12:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दादरला टेम्पोच्या धडकेत दोन तरुण ठार

दादरला टेम्पोच्या धडकेत दोन तरुण ठार

Published On: Feb 12 2018 2:13AM | Last Updated: Feb 12 2018 2:13AMमुंबई : प्रतिनिधी

मिनी टेम्पोची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात मनिष ठाकूर, वेदांत नार्वेकर या दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा दादर परिसरात घडली. याप्रकरणी दादर पोलिसांनी हलगर्जीपणाने टेम्पो चालवल्याप्रकरणी जयदेव यादव या टेम्पोचालकास अटक केली आहे. 

दुचाकीस्वाराने  हेल्मेट घातले नसल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.  मनिष, वेदांत हे दोघेही भोईवाडा आणि प्रभादेवी परिसरात राहात होते. शनिवारी रात्री दुचाकीवरून जाताना  वीर सावरकर रोडवरील कीर्ती कॉलेज जंक्शन परिसरात भरवेगात जाणार्‍या मिनी टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दादर पोलिसांनी प्रज्ञेश विलास मिस्त्री याच्या जबानीवरून टेम्पोचालका विरोधात गुन्हा नोंदवला. रविवारी त्याला भोईवाडा येथील लोकल कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.