Tue, Jun 18, 2019 23:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन महिलांकडून सोने जप्त 

आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन महिलांकडून सोने जप्त 

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:22AMमुंबई:  प्रतिनिधी 

विदेशात चोरट्या मार्गाने सोने आणणार्‍या दोन महिलांना रविवारी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. शेख जनहारा शब्बीर आणि रहम बशीर अब्दलेगदीर मोहम्मद अशी या दोघींची नावे असून त्यांच्याकडून या अधिकार्‍यांनी सुमारे 30 लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. 

रहम मोहम्मद ही महिला रविवारी अदिसअबाबा येथून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती.  तिने तिच्या शरीरात सोने लपवून आणले होते. विमानतळाबाहेर जाण्यापूर्वी तिला या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी तिच्या अंगझडतीत या अधिकार्‍यांना सतरा लाख रुपयांचे सोने सापडले. दुसर्‍या घटनेत शेख जनहारा या महिलेस तेरा लाख रुपयांच्या सोन्यासह या अधिकार्‍यांनी अटक केली. ती दुबईहून रविवारी पहाटे सहा वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तिने कॉफीच्या कपातून तेरा लाख रुपयांचे सोने आणले होते.

Tags : Mumbai, mumbai news, Two women, seized gold, international airport,