Thu, Jul 18, 2019 12:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरमध्ये दोन बहिणींचा बुडून मृत्यू

पालघरमध्ये दोन बहिणींचा बुडून मृत्यू

Published On: Apr 27 2018 1:39AM | Last Updated: Apr 27 2018 1:19AMमनोर : वार्ताहर 

पालघर जवळील आगवन येथील एका तलावात बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी संध्याकाळी घडली. यामुळे आगवनसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सहावीत शिकणारी सुरक्षा किशोर माच्छी (12) आणि तिसरीत शिकणारी खुशबू किशोर माच्छी (8) या दोघी आपल्या कुटुंबासमवेत आगवन येथे रहायच्या. त्या बुधवारी संध्याकाळी आगवन येथील तलावावर अंघोळीसाठी गेल्या असता त्यांचा पाय घसरून पडल्याने तलावात बुडून मृत्यू झाला. त्यांना स्थानिकांनी तलावाबाहेर काढून पालघरच्या ढवळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. 

चेन्नईचे 3 विद्यार्थी धरणात बुडाले

पुणे : चेन्‍नई येथून उन्हाळी शिबिरासाठी कातरखडक (ता. मुळशी) येथे आलेल्या तीन शाळकरी मुलांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. डॅनिश कलिम अनसारी, संतोष गणेश आणि सर्वान्‍ना मुरूगराजा कुमार अशी त्यांची नावे आहेत. यातील एक मृतदेह बुधवारी रात्री तर दोन मृतदेह गुरुवारी दुपारी सापडले. उन्हाळी शिबिराच्या पहिल्याच दिवशी कातरखडक तलावावर फिरण्यासाठी गेले असता, तिघे जण पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पौड वार्ताहराने दिली आहे.  

Tags : Mumbai, Two sisters, drown died,  Palghar, Mumbai news,