होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोघा पोलिसांना कारने उडवले

दोघा पोलिसांना कारने उडवले

Published On: Jan 21 2018 2:50AM | Last Updated: Jan 21 2018 12:49AMठाणे : प्रतिनिधी

सोनसाखळी चोरांना अटकाव करण्यासाठी उभारलेल्या तपासणी नाक्यावर गस्त घालत असतांना भरधाव कारने दोघा पोलिसांना उडवल्याची घटना शनिवारी सकाळी आरटीओ ऑफिस नजीकच्या सर्व्हिस रोडवर घडली. या घटनेत दोघा पोलिसांच्या पायाला जबर मार लागला. पोलिसांनी कार चालकास त्वरित अटक केली. वागळे स्टेट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार व पोलीस नाईक विष्णू पाटील हे दोघेही शनिवारी सकाळी गस्तीवर होते. दरम्यान, सोनसाखळी चोरांना अटकाव करण्यासाठी उभारलेल्या सर्व्हिस रोड वरील तपासणी नाक्यावर दोघेही पोलीस आले असतांना आरटीओ कार्यालयानजीक एका भरधाव वेगात आलेल्या आय टेन या कारने दोघांना जोरदार धडक दिली. 

या धडकेत दोघा पोलिसांच्या पायाला जबर मार लागला. या घटनेची खबर मिळताच वागळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून कार चालक अशोक दादाजी राय (54) यास अटक केली. दोघा जखमी पोलिसांची प्रकृती स्थिर असून त्यांना मुलुंडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.