होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईवर दोन विमानांची टक्‍कर टळली

मुंबईवर दोन विमानांची टक्‍कर टळली

Published On: Feb 12 2018 2:13AM | Last Updated: Feb 12 2018 2:11AMमुंबई : वृत्तसंस्था

मुंबईच्या अवकाशात रविवारी विस्तारा आणि एअर इंडिया या दोन विमानांची टक्‍कर थोडक्यात टळली. याबाबत विमान अपघात शोध ब्युरोने चौकशी सुरू केली आहे. 7 फेब्र्र्र्रुवारी रोजी विस्तारा कंपनीचे विमान 152 प्रवाशांना घेऊन निघाले. त्यावेळी एअर इंडियाच्या भोपाळला जाणार्‍या विमानापासून ते फक्‍त 100 फूट अंतरावरून गेले. एअर इंडियाच्या विमानात 109 प्रवासी होते.

दोन्ही विमाने अगदी जवळ आली असताना ऑटोमेटिक वॉर्निंग अ‍ॅलर्ट सुरू झाला. एअर इंडियाच्या वैमानिकाने इशारा मिळताच आपले विमान सुरक्षित अंतरावर नेल्याने मोठी दुर्घटना टळली. यासंदर्भात विस्ताराच्या दोन वैमानिकांची चौकशी सुरू असून एअर इंडियाच्या वैमानिकाचा यात दोष नसल्याने त्याला विमान उड्डाणाची परवानगी देण्यात आली आहे. विस्ताराच्या दोन्ही पायलटला आता चौकशी होईपर्यंत विमान उडवता येणार नाही.