होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोन मोटरसायकलींच्या टक्करीत तिघांचा मृत्यू

दोन मोटरसायकलींच्या टक्करीत तिघांचा मृत्यू

Published On: Apr 15 2018 1:28AM | Last Updated: Apr 15 2018 12:46AMतलासरी : वार्ताहर

उधवा-खानवेल रस्त्यावर खरडी गावाच्या हद्दीत टीमा कंपनीजवळ शुक्रवारी संध्याकाळी दोन मोटरसायकलींची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषणत अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला.

खरडी येथे टीमा कंपनीजवळ शुक्रवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास उधव्याकडून खानवेलच्या दिशेला जाणार्‍या तर खानवेलवरून उधव्याच्या दिशेने येणार्‍या मोटरसायकलींची समोरासमोर टक्कर झाली. यात अजय रामू धोडी (27, रा. अच्छाड तलासरी) लक्ष्मण वसंत घुटे (50) आणि गंगाराम बोरसा (40, रा. गडचिंचले, चौकीपाडा डहाणू) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच सुमन सुधीर झा (34, रा. अच्छाड, तलासरी) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला सिल्वसा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. या अपघाताची दादरा नगरहवेली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Tags : Mumbai, Two motorcycle, accident, Three, death, Mumbai news,