Sun, Jul 21, 2019 01:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उल्हासनगरमध्ये दोन लाखांच्या साडेतीन फुटी मांडुळाची तस्करी

उल्हासनगरमध्ये दोन लाखांच्या साडेतीन फुटी मांडुळाची तस्करी

Published On: Aug 14 2018 1:35AM | Last Updated: Aug 14 2018 1:15AMउल्हासनगर : वार्ताहर

एका तस्कराच्या ताब्यातून दोन लाख रुपये किंमत असलेल्या साडेतीन फुटाचा मांडूळ जातीच्या सापाची सुटका करण्यात हिललाईन पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून दुसरा तस्कर फरार झाला आहे. रामचंद्र सेनानी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचा फरार साथीदार अनिल लोचानी याचा पोलीस शोध घेत आहेत.

रविवारी सायंकाळी हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे यांना नेताजी चौक परिसरात मांडूळ जातीच्या सापाची तस्कराकडून विक्री केली जाणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पलंगे यांनी तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एन. कौराती, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सुदीप भिंगारदिवे, गिरी, असवले, जावळे यांच्या पथकाला सदर ठिकाणी सापळा रचून कारवाईचे निर्देश दिले. 

पोलिसांनी नेताजी परिसरात सापळा लावताना बातमीदारालाही सोबत घेतले. बराच वेळ निघून गेला तरी तस्कर येत नव्हता. तेव्हा तस्कराने ठिकाण बदलले असून तो व्हीनस ते लालचक्की रोडवर व्यवहार करणार असल्याचे बातमीदाराने सांगताच पोलिसांनी त्यादिशेने मोर्चा वळवला. काही मिनिटांनी एक जण रिक्षातून उतरला. तस्कर असल्याची खात्री पटताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याच्याकडील गोणमध्ये मांडूळ सापडले.