Fri, Apr 26, 2019 19:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोन अपघातांत वृद्धासह दोघांचा मृत्यू

दोन अपघातांत वृद्धासह दोघांचा मृत्यू

Published On: May 16 2018 1:43AM | Last Updated: May 16 2018 1:17AMमुंबई : प्रतिनिधी

शहरात सोमवारी दिवसभरात दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एका 62 वर्षांच्या वयोवृद्ध रिक्षाचालकासह दोघांचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले. दोन्ही अपघात मालाड आणि दहिसर परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी मृत वयोवृद्ध रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला तर दहिसर पोलिसांनी आरोपी डंपरचालकास अटक केली आहे. अस्लम यासीन खान हे  62 वर्षांचे वयोवृद्ध रिक्षाचालक असून ते मालाडच्या मालवणीतील गायकवाड नगर, गेट क्रमांक आठमध्ये राहतात. सोमवारी रात्री रुपसिंग सोहनसिंग चौहाण आणि त्याची मेहुणी अन्वराबिबी हिच्यासोबत रिक्षाने जात होता. ही रिक्षा अस्लम खान हे चालवित होते. 

मालाडच्या मार्वे रोड, मढजवळील धारवली गाव पुलाजवळील वळणावरुन जात असताना अस्लमचा रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि अपघातात ते तिघेही जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमींना पोलिसांनी तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र, अपघातात जबर जखमी झालेल्या अस्लम खान यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर रुपसिंग आणि अन्वराबिबीवर तिथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अस्लमविरुद्ध मालवणी पोलिसांनी हलगर्जीपणाने रिक्षा चालवून स्वतःच्या मृत्यूस तर दोघांना गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. दुसरा अपघात दहिसर टोलनाका, उत्तरवाहिनी लेन दोनजवळ झाला.