Tue, Jul 23, 2019 07:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › Mumbai rain : कर्नाळाजवळ पूल खचला; मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक ठप्प

Mumbai rain : मुंबईत मरिन लाईन, गोल मस्‍जिदजवळ रस्‍ता खचला

Published On: Jun 25 2018 7:48AM | Last Updated: Jun 25 2018 7:14PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

मुंबई शहर आणि उपनगरात काल दिवसभर आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी देखील संततधार सुरुच राहीली. याचा परिणाम मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या लोकल सेवेवर झाला. तिन्ही मार्गावरील लोकल गाड्या उशिरा धावत आहेत. महामार्गावर पाणी आल्याने रस्ते वाहतूक देखील मंदावली आहे. दरम्यान, कर्नाळ्याजवळ एक पूल खचल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.  तर उल्हासनगरमध्ये घराची भिंत कोसळून 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तर तिघे जण जखमी झाले आहेत.त्याआधी सकाळी वडाळा येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळली होती. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.   

मुंबई शहर आणि उपनगरात काल पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. शहरातील एम.जी.रोडवरील मेट्रो सिनेमाजवळ एक झाड कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. नवी मुंबईतील खारघर येथील तळोजा कारागृहासमोर असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. काही तरुण तलावात पोहण्यासाठी गेले असता त्यातील एकजण बुडू लागल्याने दोघे त्याला वाचवण्यासाठी गेले आणि तिघेही बुडाले. या तिघांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून अन्य दोघांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. फैयान खान (वय-19), रियान खान (वय-19) आणि अबिद सिद्दिकी (वय-36) अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.  

दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत ठाण्यात 100 मिमी पावसाची नोंद झाली. पुढील चार दिवस मुंबईसह राज्यभर जोरधार बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शहर आणि उपनगरात रात्रभर पाऊस पडल्याने मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील उशिरा सुरु आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. 

नवी मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस 

नवी मुंबईत रात्रीपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. सायन पनवेल महामार्गावर कंळबोली उड्डाणपूल खाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. यामुळे कंळबोली शहरात जाणा-या मार्गावर वाहनचालकांची पंचाईत झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली. तर काही ठिकाणी एमएससीबीची केबल फोल्डट झाल्याने पहाटेपासून विघुत पुरवठा खंडीत झाला आहे. रिक्षाच्या प्लगमध्ये पाणी गेल्याने रिक्षा बंद पडू लागल्या आहे. ठाणे बेलापूर मार्गावर व सायन पनवेल महामार्ग सकाळी वाहने बंद पडलूयाने वाहतूक कोंडी झाल्याने रांगा लागल्या होत्या. कोपरखैरणे भुयारी मार्गात पाणी साचले आहे. नेरूळे, बेलापूर, सानपाडा, खांदेश्वर रेल्वे स्थानकांवर पाण्याची गळती सुरू झाली आहे.

Update

-मुंबईत मरिन लाईन, गोल मस्‍जिदजवळ रस्‍ता खचला, पाईपलाईन फुटल्याने रस्‍ता बंद

-दुपारनंतर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तानसा नदीचे पाणी पात्राबाहेर 

अंबरनाथ- वडोळ गावात संरक्षक भिंत पडली, एकाचा मृत्यू 

- मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद 

-  मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

-   पायधुनी येथे चार मजली जिर्ण इमारतीचा काही भाग कोसळला, इमारत रिकामी असल्यामुळे जीवितहानी नाही

- पावसामुळे मुलुंडच्या राहुल नगर येथील गुरु गोविंद सिंग मार्गालगतची भिंत कोसळली 

-  वडाळातील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत कोसळल्याप्रकरणी दोस्ती बिल्डरविरोधात गुन्हा दाखल 

- नवी मुंबई: तुर्भे येथे वाहतूक कोंडी, वाहतूक पोलिस उपस्थित पण खड्डे असल्याने वाहतूक संथ गतीने 

- उल्हासनगरमध्ये घराची भिंत कोसळून 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तर तिघे जण जखमी 

- बलसाडजवळ भिलाड-संजान रेल्वे स्थानक परिसरात रेल्व रुळाखालील माती धसल्याने मुंबईकडे येणाऱ्या मेल गाड्या बंद करण्यात आल्या 

- पाण्याचा अंदाज न आल्याने विरार (पश्चिम) येथील स्टार प्लॅनेट हॉटेलजवळ गाडी नाल्यात पडली 

- खांदेश्वर रेल्वे स्थानकात पाणी साचले

- कळंबोली येथे वाहतूक कोंडी

- ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावरील वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने

- नवी मुंबई: मुसळधार पावसामुळे उलवेकडून बेलापूरकडे जाणारा रस्ता पाण्याखाली
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कामे ठप्प 

- मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली

- मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक ठप्प, कर्नाळाजवळ पूल खचल्याने गेल्या 3 तासापासून वाहतूक ठप्प झाली 

- वडाळा येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत कोसळली; कोणतीही जीवितहानी झाली नाही

- मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु

- मुंबईतील सखल भागात पाणी साचले

- सायन, चेंबूर, जेव्हीएलआर परिसरात वाहतूक कोंडी

000

Image may contain: outdoor

ठाणे आणि भिवंडीत सर्वाधिक पाऊस

गेल्या  २४ तासात सर्वात जास्त ठाणे आणि भिवंडी तालुक्यात पाऊस पडला आहे. ठाणे तालुक्यात 19.98 मीमी तर भिवंडी तालुक्यात 19.27 मीमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक कमी पाऊस शहापूर तालुक्यात पडला आहे.  त्‍याठिकाणी 5.95 मीमी इतका पाऊस पडल्याची माहिती पर्जन्यमान विभागाने दिली.  

मालाडमध्ये नाल्यात पडून तरूणाचा मृत्यू

सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईसह उपनगरात सर्वच सखल भागात पाणी साचले. नालेदेखील तुडुंब भरले आहेत. मालाड पश्चिम येथे नाल्यात पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. नागेंद्र नागार्जुन (१८) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. मालाड पश्चिम एव्हर शाईन नगर येथील हिमाचल इमारतीच्य समोरील नाल्यामध्ये दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.