Fri, Aug 23, 2019 23:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नालासोपार्‍यात कचरापेटीत सापडले दोन दिवसांचे अर्भक

नालासोपार्‍यात कचरापेटीत सापडले दोन दिवसांचे अर्भक

Published On: Feb 12 2018 2:18AM | Last Updated: Feb 12 2018 1:25AM नालासोपारा : वार्ताहर

नालासोपारा पूर्वेत शिर्डीनगर येथे दोन ते तीन दिवसांचे नवजात अर्भक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तुळींज पोलिसांनी त्या बाळाला पालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर एनआयसीयू विभागात उपचार सुरू आहेत.शिर्डीनगर येथील साई प्रकाश निवास चाळीच्या बाजूला कचर्‍याच्या डब्यात रविवारी सकाळी  एक पुरुष जातीचे अर्भक टाकून अज्ञात निर्दयी मात्यापित्याने पलायन केले. तेथे राहणार्‍या नागरिकांना त्याच्या रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता त्यांना संबंधित बाळ दिसले.

नागरिकांनी ताबडतोब तुळींज पोलिसांना कळवले. यानंतर पोलीस कर्मचारी बालाजी मुंडे आणि हनुमंत डोईफोडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून बाळाला ताब्यात घेऊन पालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल केले. बाळावर एनआयसीयू विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी अज्ञात मातापित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.