Sat, Mar 23, 2019 01:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 1 कोटीचा एमडीचा साठा सापडला 

1 कोटीचा एमडीचा साठा सापडला 

Published On: Jul 16 2018 1:43AM | Last Updated: Jul 16 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी

सुमारे एक कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्जसहीत दोघांना गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सलीम अहमद खान आणि नूरील हुदा समशुद्दीन अली शेख अशी या दोघांची नावे असून या दोघांनाही वांद्रे आणि नागपाडा येथून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपींच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. 

सलीम हा नागपाडा परिसरात राहत असून एमडी ड्रग्ज विक्रीत सक्रिय होता. त्याच्याकडे एमडी ड्रग्जचा साठा असून त्याच्या विक्रीसाठी तो वांद्रे परिसरात येणार असल्याची माहिती शुक्रवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानंतर या पथकाने तेथे साध्या वेशात पाळत ठेवून सलीम खान याला अटक केली. यावेळी त्याच्याकडून पंधरा लाख रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. तसेच त्याच्या  घरातूनही पोलिसांनी एक कोटी तीन लाख रुपयांचा साठा जप्त केला.