होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाड : केंबूर्लीजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार 

महाड : केंबूर्लीजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार 

Published On: Apr 25 2018 1:40PM | Last Updated: Apr 25 2018 1:40PMनाते (महाड) : वार्ताहर 

मुंबई–गोवा महामार्गावरील महाड शहराजवळ असलेल्या केंबूर्ली गावाजवळ मंगळवारी रात्री महाडकडे येणाऱ्या दुचाकीस्वारचा अपघात झाला. या अपघातात भूषण मोरे या हॉटेल चालकाचा जागीच मृत्यू झाला. 

भूषण मोरे हे त्यांची गाडी होंडा शाईन (एम एच 06 बीएस 3393) वरून रात्री साडेबाराच्या दरम्यान महाडकडे येत होते. काही अंतरावर आले असता त्यांची गाडी खड्यात पडली. या अपघातात भूषण यांच्या डोक्याला व नाकाला मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.  

भूषण हे हॉटेल नीलकमलचे मालक आहेत. उशीर झाला तरी ते घरी आले नाहीत यामुळे मित्र व नातेवाईकांनी शोधाशोध केली. महामार्गावरील रुची हॉटेल शेजारी अपघात झाल्याचे काही व्यक्तींना दिसले.  यामुळे काही लोकांनी याची माहिती भूषण यांच्या कुटुंबियांना दिली. यानंतर मित्रांनी घटनास्थळी धाव घेत मृत व्यक्ती भूषणच असल्याची खातरजमा करून घेतली. ओळख पटल्यांतर भूषणचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. 

भूषणचा अपघात नक्की कशाने झाला याबाबत माहिती मिळाली नाही. महाड रस्त्यावर चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु असून या ठिकाणी लोखंडी सळ्या पडल्याचे दिसून आले. या अपघाताची नोंद महाड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Tags : Two Wheeler, Accident, Mahad, Dead, Police, Crime