Thu, Jul 18, 2019 08:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी भाषा एका टेबलवरून दुसऱ्या टेबलावर; वाचा एक व्हायरल पोस्ट! 

मराठी पाट्या; ‘हा विभाग आमच्या आखत्यारीत येत नाही’

Published On: Apr 06 2018 1:53PM | Last Updated: Apr 06 2018 1:53PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी योग्य ती भूमिका आम्ही नक्की घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या (२७ फेब्रुवारी २०१८)मराठी भाषा दिनानिमित्त विधान भवनात दिली होती. पण, इतक्यातच फडणवीस सरकारला मराठी भाषेचा विसर पडल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या दिसाव्यात यासाठी एका व्यक्तीने ‘आपले सरकार’ या पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. ही तक्रार लक्षात घ्यायचं तर सोडाच पण त्याला समाधानकारक उत्तरही या सरकारने दिले नाही. 

एका ट्विटर युजरनी ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ‘आपल सरकार’ या पोर्टलवर एक ‘मराठी भाषेतील पाट्या असाव्यात अशी तक्रार दाखल केली होती. त्यावर कोणतेही उत्तर न देता ‘हा विभाग आमच्या आखत्यारीत येत नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यामुळे हे सरकार मराठी भाषेबद्दल जराही गंभीर नसल्याची बाब या ट्विटमधून समोर येत आहे. सरकारी कार्यालयात जसे फाईल एका टेबलवरून दुसरीकडे पाठवण्यात येते अगदी तसेच या प्रकरणातून सरकारने हात काढून घेतल्याचे चित्र आहे. 

काय होती तक्रार

‘मला ही तक्रार वसई, विरार, नालासोपारा इतर महानगरपालिका व पालघर जिल्ह्यातील सगळे दुकानदार, सरकारी व खाजगी बँका, रेस्टॉरंट्स, पब, लाउंज, डिस्को,  यांसह आदी ठिकाणी फक्त आणि फक्त इंग्रजी व मराठी भाषेतील पाट्या दिसतात. सरकारचा अधिनियम २००८ साली परिपत्रक काढून सर्वच ठिकाणी मराठी पाट्या वापरणे बंधनकारक केले आहे. सरकारच्या या अधिनियमाचा सर्वत्र अनादर होताना दिसत आहे. आम्ही एक परिपत्रक काढून नोटीस बजावावी असे निवेदन आम्ही महाराष्ट्र सरकार, मराठी भाषा विभाग आणि वसई नालासोपारा शहर महानगरपालिकेला दिले आहे. फक्त नोटीस देऊ नये तर त्याची अंमलबजावणी झाली की नाही याकडे लक्ष ही द्यावे. अपेक्षा सरकार यावर सकारात्मक कारवाई करेल...अशा आशयाची तक्रार महाराष्ट्र सरकारच्या ‘आपलं सरकार’ या पोर्टलवर करण्यात आली होती. 

सरकारचे उत्तर

या तक्रारीवर मुंबई दुकाने व अस्थापना अधिनियम, १९४८ तसेच महाराष्ट्र दुकाने व संस्था नियम १९६१ अंतर्गत दुकानाच्या पाट्या मराठीत लिहिण्याच्या सूचना उद्योग विभागाकडून देण्यात आल्या आहेत. सदर विषय उद्योग विभागाच्या कक्षेत आहे, असे उत्तर सरकारकडून देण्यात आले. 

ही पोस्ट अश्विनी भोसले मोरजकर या युजरनी ट्विटरवर शेअर केली आहे. ‘मराठी पाटया या विषयावर मी महाराष्ट्र सरकारला आपले सरकार या वेबसाईटवर एक तक्रार नोंदवली होती. सरकारचा आलेला रिप्लाय वाचल्यावर सरकार मराठी भाषेबद्दल किती गंभीर आहे हे कळत असल्याची पोस्ट अश्विनी यांनी केली आहे. 
 

Tags : Maharashtra Government, Mumbai, Nameplates, Hotels, Vasai Nalasopara Muncipal Carporation, Twitter, Post,