Thu, Apr 25, 2019 15:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाईट बंद करण्यावरून पत्नीची केली हत्या

लाईट बंद करण्यावरून पत्नीची केली हत्या

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 23 2018 10:11AMमुंबई : प्रतिनिधी

रात्रीच्यावेळी लाईट बंद करण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून रागाच्या भरात पतीने गळा आवळून 25 वर्षीय पत्नीची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री शिवडीमध्ये घडली. लिपी शेख असे या मृत विवाहितेचे नाव असून हत्येच्या गुन्ह्यामध्ये शिवडी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

मूळचा पश्‍चिम बंगालमधील रहिवाशी असलेला बिलाल करीम शेख (26) हा पत्नी आणि दोन मुलांसोबत शिवडीतील दारुखाना परिसरात राहात होता. विवाहानंतर काही महिन्यांतच दोघांमध्ये खटके उडू लागले. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरातील लाईट बंद करण्यावरुन बिलालने लिपीसोबत वाद घातला. वाद विकोपाला जाताच बिलालने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन नाक-तोंड दाबत गळा आवळून तिची निर्घुण हत्या केली. लिपी आणि बिलालचे कडाक्याचे भांडण झाल्याचे लिपीच्या आईला समजले. तिने लागलीच लिपीच्या घराच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा लिपी बेशुद्ध होऊन पडली होती. तीने शेजार्‍यांच्या मदतीने लिपीला उपचारांसाठी जे. जे. रुग्णालायत नेले. मात्र रात्री तीनच्या सुमारास डॉक्टरांनी लिपीला मृत घोषीत केले. 

लिपीच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात नाक-तोंड दाबून डोक्यावर जोराचा फटका मारुन आणि गळा आवळून लिपीची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट होताच शिवडी पोलिसांनी तीची आई मुनीरा शेख (50) हिची फिर्याद दाखल करुन घेत, आरोपी पती बिलाल विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. रात्री उशिरा त्याला याच गुन्ह्यात अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags : mumbai, mumbai news, Turning off the lights, Wife, murder,