Thu, Jun 27, 2019 00:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रचंड वाहतुकीच्या वेळी सीएनजी पंप बंद ठेवा

प्रचंड वाहतुकीच्या वेळी सीएनजी पंप बंद ठेवा

Published On: Aug 12 2018 1:09AM | Last Updated: Aug 12 2018 1:04AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईत प्रचंड वाहतुकीच्या ट्रॅफिकच्या वेळांमध्ये सीएनजीचे पंप बंद ठेवण्याची वाहतूक पोलिसांनी केलेली सूचना महानगर गॅस प्राधिकरणाने मान्य केली आहे.

गॅस भरण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेमध्ये जास्त वेळ लागतो. मुंबईमध्ये चारचाकी गाड्यांसह रिक्षादेखील सीएनजीवर धावतात. गॅससाठी अनेकदा रांग सोडून वाहनचालक वाट्टेल तशा गाड्या उभ्या करतात आणि वाहतूक खोळंबते. यावर मात करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा पर्याय सुचवला आहे.

मुंबई व उपनगरांत 132 सीएनजी पंप हे दिवस रात्र सुरू असतात. या पंपांवर टॅक्सी, ओला, उबेरच्या गाड्या, खासगी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये भर पडत असल्यामुळेच हे पंप ट्रॅफिकच्या वेळेत बंद ठेवावेत अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. महानगर गॅसनेही वाहतूक पोलिसांची ही मागणी मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

आमची याबाबत महानगरच्या अधिकार्‍यांशी चर्चा झाली असून ते पिक अव्हरला पंप बंद ठेवण्यासाठी तयार झाले आहेत, असे वाहतूक सह पोलीस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे सीएनजी पंपांवरील रांगा कमी होऊन वाहतूक कोंडी टळणार असली तरी नेमक्या कोणत्या वेळेत सीएनजी पंप बंद ठेवणार हे स्पष्ट झालेले नाही.