Mon, May 20, 2019 08:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तूरडाळ ५५ रु. किलोे; सरकारचे आदेश जारी

तूरडाळ ५५ रु. किलोे; सरकारचे आदेश जारी

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 03 2017 12:19AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात रेशनकार्डावर 55 रुपये किलो दराने तूरडाळ विकण्यात येणार आहे. यााबाबतचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने त्यासंदर्भातील आदेश सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. देशात तूरडाळीच्या दरवाढीने सामान्यांच्याच नव्हे तर मध्यमवर्गीयांच्या ताटातील तूरडाळही गायब झाली होती. किलोमागे 250 रुपयांची पातळीही तूरडाळीने ओलांडली होती. 

राज्य व केंद्र सरकारवर टीकाही झाली . त्यानंतर तुरीचे बंपर पीक आले व सरकारसमोर खरेदीचे संकट उभा राहिले. आता सरकारने खरेदी केेलेल्या तुरीपासून भरड करून डाळ तयार केली जात असून हीच डाळ रेशनवर वितरित करण्यात येत आहे.