Tue, Nov 20, 2018 03:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्नावरुन प्रियकराने आवळला प्रेयसीचा गळा

लग्नावरुन प्रियकराने आवळला प्रेयसीचा गळा

Published On: May 03 2018 1:42AM | Last Updated: May 03 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी

लग्नावरुन झालेल्या वादानंतर प्रियकरानेच त्याच्याच प्रेयसीची गळा आवळून हत्येचा प्रयत्न केला. दुपारी गोरेगावच्या छोटा काश्मीरमध्ये उघडकीस आलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी प्रेयसीच्या जबानीवरुन पळून गेलेल्या प्रियकराविरुद्ध आरे पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला असून त्याचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांनी सांगितले. दरम्यान या तरुणीला प्राथमिक औषधोपचारानंतर तिच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे. 

प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळल्याची  माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून आरे पोलिसांना मिळाली, ही माहिती मिळताच घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी या तरुणीला तातडीने जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. ती शुद्धीवर येताच तिची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात आली. तिच्या जबानीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या प्रियकराविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. तक्रारदार तरुणीसह आरोपीचे नाव सांगण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांनी नकार दिला.