Fri, Apr 26, 2019 01:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुजार्‍याचा महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न 

पुजार्‍याचा महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न 

Published On: Aug 12 2018 1:09AM | Last Updated: Aug 12 2018 12:36AMडोंबिवली : वार्ताहर

कथित बाबांकडून लैंगिक अत्याचाराच्या घटना उजेडात येत असताना कल्याण पूर्वेलाही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. कल्याण पूर्व सूचक नाका परिसरात असलेल्या गणपती मंदिरातील पुजार्‍याने आजारी महिलेला बरे करण्याच्या बहण्याने बोलावून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या महिलेने मंदिराबाहेर धाव घेत बाहेर सामान आणण्यास गेलेल्या पतीला सर्व हकीकत सांगितली. हा प्रकार आसपासच्या महिलांना कळताच महिलांनी मंदिरात घुसून पुजारी गोपाळ तांबेसह त्याच्या मुलाला चोप दिला. हा प्रकार आसपासच्या महिलांना समजताच संतापलेल्या महिलांनी मंदिरात घुसून तांबे व त्याच्या मुलाला बेदम चोप दिला. 

पीडित महिलेने या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारी नुसार पोलिसांनी पुजार्‍याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर, आपल्या वडिलांना बदनाम करण्यासाठी महिलेने खोटे आरोप केल्याचे पुजार्‍याच्या मुलाने सांगितले.

पीडित महिला म्हारळ येथे राहत असून ती काही दिवसांपासून आजारी होती. तिला कल्याण पूर्वेकडील सूचक नाक्यावरील गणपती मंदिरात तांबे या पुजार्‍याकडे जाण्यास सांगितले. ही महिला आपल्या पतीसह या मंदिरात गेली. या पुजारीकडे आवळे गार्‍हाणे मांडले. त्यावेळी पुजार्‍याने फळ देवाला चढवल्यास तिला बरे वाटेल, असे सांगत महिलेच्या पतीला फळ आणण्यास सांगितले. पती बाहेर गेल्यानंतर या पुजार्‍याने आपल्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला.