Thu, Jun 27, 2019 10:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्हॉट्सअ‍ॅपवरून दिला ट्रिपल तलाक!

व्हॉट्सअ‍ॅपवरून दिला ट्रिपल तलाक!

Published On: Apr 29 2018 2:39AM | Last Updated: Apr 29 2018 2:16AMमुंबई : प्रतिनिधी 

विरार येथील यावर मन्सूर खान याने  पत्नीला थेट व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ पाठवून तलाक दिला. त्याविरोधात पत्नी फरहान खान हिने न्यायालयात खटला दाखल केला म्हणून तिला आणि तिच्या वडिलांना मन्सूर खानने न्यायालयाच्या आवारातच मारहाण केली. मात्र, मन्सूर खानला अटक करण्याऐवजी पोलिसांनी त्याला मोकाट सोडले असल्याचा आरोप फरहान खानने शनिवारी प्रेस क्‍लब येथे पत्रकार परिषदेमध्ये केला. 

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात यावर मन्सूर खान याने फरहान हिला, तुझे आपल्याशी जमत नसल्याचे सांगत व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ तयार करून ट्रिपल तलाक दिला होता. याविरोधात न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या आणि केंद्रात झालेल्या ट्रिपल तलाकच्या कायद्याच्या आधारे फरहान हिने न्यायालयात आपला लढा सुरू केला असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच ठाणे जिल्हा न्यायालयात आपण त्याच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत खटला दाखल केल्याने त्याने आपल्याला न्यायालयाच्या आवारातच केस धरून मारहाण केली. याविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी धाव घेतली मात्र पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही. यामुळे न्यायासाठी आपण माध्यमात आले असल्याचे फरहान हिने स्पष्ट केले. 

Tags : Mumbai, mumbai news, Triple divorce, given, Whatsapp,