Sat, Jan 19, 2019 11:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदिवासी विद्यार्थी दीपेश करमोडाचा विश्वविक्रम

आदिवासी विद्यार्थी दीपेश करमोडाचा विश्वविक्रम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डहाणू ग्रामीण : वार्ताहर

डहाणू तालुक्यातील जि.प.शाळा गोवणे शाळेतील सहावीचा विद्यार्थी दीपेश रामचंद्र करमोडा (11) या विद्यार्थ्याने फास्टेस्ट टू अरेंज अल्फाबेट्स  या प्रकारात नव्या विश्वविक्रमाची नोंद करताना आपल्याच वर्गशिक्षकांचा विक्रम मोडला. यापूर्वी त्याचे शिक्षक विजय पावबाके यांनी 28.45 सेकंद वेळ नोंदवून हा विक्रम नोंदवला होता. परंतु, शिष्य असलेल्या दीपेशने हा विक्रम मोडून 26.30 सेकंदाचा नवा विश्वविक्रम स्वतः च्या नावावर केला.  यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जि. प. शाळेतील मुलाचे नाव झळकवणारा देशातील पहिला विद्यार्थी होण्याचा बहुमानही त्याने पटकावला आहे.

दीपेशचे वर्गशिक्षक पावबाके यांनी याच प्रकारात नोव्हेंबर मधे विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या विक्रमाची माहिती दिली. सुरुवातीला मुलांना हे खूप वेगळे व आव्हनात्मक वाटत होते. पण दिपेश, अनिल, आकाश व प्रशांत या विद्यार्थ्यांनी हे आव्हान स्वीकारले. वर्गशिक्षकांनी त्यांना आवश्यक साहित्य आणून दिले व योग्य मार्गदर्शन करून घरी सराव करण्यास सांगितले.

सरवादरम्यान दीपेशने 27 सेकंदात ही अ‍ॅक्टिव्हिटी पूर्ण केली. सरावसाठी त्याचा मोठा भाऊ गुलशन व बहिणींनी त्याला मदत केली. त्यानंतर 14 फेब्रुवारीला टाइमकीपर  वायेडा, मयुरी राऊत, साक्षीदार दीपक साळवी व नितल वर्तक यांच्यासह निवडक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिपेशच्या रेकॉर्डचे शूटिंग करण्यात आले. त्याने पहिल्याच प्रयत्नात वेग व अचूकता याचा योग्य मेळ साधत अवघ्या 26.30 सेकंदात अ‍ॅक्टिव्हिटी पूर्ण करून नव्या जागतिक विक्रमाची नोंद केली. 

याबाबतचे सर्व पुरावे व नोंदणीकृत माहिती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अकाऊंटकडे पाठवण्यात आले. त्यानंतर खातरजमा करून 27 मार्चला दिपेशच्या विक्रमाची अधिकृत नोंद गिनीजमध्ये करण्यात आली. गिनीज प्रमाणपत्र आणि टी शर्टासाठी 90 युरोची (रु.7200) आवश्यकता होती. यासाठी निशांत सर, स्वाती मॅडम व योगेश सावे यांच्या प्रारंभ संघाने मदत केली.

 

Tags : mumbai, mumbai news, Tribal student, Dipesh Karmodacha, world record,


  •