Thu, Nov 15, 2018 16:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाहतूकदार आंदोलन चिघळणार

वाहतूकदार आंदोलन चिघळणार

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:31AMमुंबई : प्रतिनिधी

जोपर्यंत सरकारकडून जोपर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत वाहतूकदारांचे आंदोलन सुरू राहणार असल्याचे ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस या संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, जीवनावश्यक वस्तू वाहतूकदारही संपाला समर्थन देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.

शुक्रवारपासून सुरू झालेल्या आंदोलनामुळे मुंबई आणि ठाणे तसेच रायगड परिसरात जवळपास चार लाख ट्रक उभे आहेत, तर देशभरात जवळपास 93 लाख ट्रकचा चक्काजाम आहे. या संपामुळे दररोज 10 हजार कोटींचे नुकसान वाहतूक उद्योगाला सोसावे लागत आहे. तर आतापर्यंत सुमारे 50 हाजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती बॉम्बे गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक राजगुरू यांनी दिली.

वाढलेले डिझेलचे दर, भरमसाट टोल यामुळे वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. मागील दोन महिन्यांपासून आम्ही सरकारसोबत याबाबतीत विचारणा करत आहोत, मात्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचे सकारात्मक उत्तर मिळाले नाही. अजूनही जर आमच्या मागण्यांवर विचार केला गेला नाही तर हा संप अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा वाहतूकदारांच्या संघटनेकडून देण्यात आला आहे.