Sat, Mar 23, 2019 12:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माळशेज घाटात दरड कोसळली; वाहतूक दोन दिवस बंद राहणार

माळशेज घाटात दरड कोसळली; वाहतूक बंद

Published On: Aug 21 2018 7:49AM | Last Updated: Aug 21 2018 10:02AMठाणे : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावासामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. आज पहाटे नगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात पुन्हा  दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही दरड एका ट्रकवर कोसळली असून ट्रकचालक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घाटात रस्त्यावर कोसळलेली दरड हटवण्याचे काम सुरु असून धुक्यामुळे कामात अडथळा येत आहे. दरम्यान घाटातील वाहतूक दोन दिवस बंद राहणार आहे. यामुळे मुंबई-अहमदनगर मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दरड कोसळल्याचे समजताच महामार्ग अधिकारी, कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. घाटात खूप धुके असल्याने दरड हटवण्याच्या कामात अडथळा येत आहे. धुक्याचा अंदाज घेऊन दरड हटविण्याचे काम सुरू असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी सांगितले.