Thu, Nov 15, 2018 16:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शुक्रवारपासून मुंबईत वाहतूक भाडे वाढणार

शुक्रवारपासून मुंबईत वाहतूक भाडे वाढणार

Published On: May 23 2018 2:01AM | Last Updated: May 23 2018 2:01AMनवी मुंबई/ मुंबई  : पुढारी वृत्तसेवा 

सलग 9व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात 2 रुपये 24 पैशांनी वाढ करण्यात आली. मुंबईत पेट्रोल 84.70 तर डिझेल 72.48रुपयांवर पोहोचले. या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारपासून 20 ते 30 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय ट्रान्सपोर्ट असोसिएशनने घेतला आहे. परिणामी भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, अन्‍नधान्याच्या किमतीदेखील वाढणार आहेत. शिवाय ही भाडेवाढ शेतकर्‍यांच्याच  खिशातून वसूल केली जाणार असल्याने बळीराजाची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशीच  होईल.

डिझेलच्या दराने प्रतिलिटर 72 रुपयांची पातळी ओलांडली असून पेट्रोलही थेट  85 रूपयांच्या घरात गेले आहे. या दरवाढीचा फटका वाहतूक व्यावसायिकांना सर्वात जास्त बसू लागल्यामुळे वाहतूक भाडेवाढ  करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरलेला नाही.  

शुक्रवारी मुंबई माल वाहतूक टेम्पो महासंघाची बैठक होणार आहे. याच बैठकीत 20 ते 30 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय होईल. इंधनदरवाढीसह विमा, टायर्सच्या किमती, चालकांचे पगार असा वाहतूक व्यावसायिकांचा खर्च वाढतच जात आहे. तरीही 2 वर्षांपासून आम्ही भाडेवाढ केली नाही, असे मुंबई माल वाहतूक टेम्पो महासंघाचे सहसचिव अमय भोर यांनी सांगितले.