Wed, Jul 17, 2019 10:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तीन अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या

तीन अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 10 2018 1:23AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

राज्य पोलीस दलातही बदल्यांचे वारे सुरू झाले असून मंगळवारी तीन अप्पर अधिक्षकांच्या बदल्या गृहमंत्रालयाने जाहीर केल्या. विशेष म्हणजे या तिन्ही अधिकार्‍यांना कोल्हापूरमध्ये नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे कार्यरत असलेल्या अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे यांची कोल्हापूरचे नवे अप्पर अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर येथील गडहिंग्लजचे अप्पर पोलीस अधिक्षक दिनेश बारी यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिक्षक पदी वर्णी लागली आहे.

तर बारी यांच्या नवनियुक्तीने रिक्त झालेल्या जागी नाशिकमधील डीटीएसचे प्राचार्य श्रीनिवास घाडगे यांची नेमणूक करण्यात आल्याचे गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे.