Tue, Apr 23, 2019 05:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ट्रान्स हार्बर सी लिंक रखडणार!

ट्रान्स हार्बर सी लिंक रखडणार!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प जसा वेळेत पूर्ण होऊ शकणार नाही तसेच शिवडी-न्हावा शेवाला जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक मार्ग पूर्ण होण्यासाठीदेखील 2023 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक लांबीच्या या समुद्री मार्गावरून 2019 मध्ये वाहने धावू शकतील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. 

एमएमआरडीएचे अतिरिक्‍त आयुक्‍त संजय  खंदारे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, पुढील वर्षीच्या जानेवारीमध्ये या मार्गाचे काम सुरू होईल. ते पूर्ण होण्यास किमान साडेचार वर्षे लागतील. 2023 च्या मध्यास त्याचे काम पूर्ण होईल.

1980 मध्ये हा प्रकल्प कागदावर तयार करण्यात आला होता मात्र पर्यावरणविषयक मंजुरी न मिळाल्याने तो बराच काळ रखडला. भर समुद्रातून हा मार्ग जाणार असल्याने सागरी अभियांत्रिकीच्यादृष्टीने खडतर आव्हाने झेलावी लागतील. एमएमआरडीएने तीन कंपन्यांना या कामाचे कंत्राट दिले असून या प्रकल्पाची एकूण किंमत 14 हजार 263 कोटी रुपये आहे. एमएमआरडीएने सुरूवातीला ठरवलेल्या किंमतीपेक्षा ती 100 कोटी रुपयांनी अधिक आहे.